अनेक जणांना माहित नसेल की आपण जो तांदूळ खातो, त्यात काही प्रमाणात आर्सेनिक आढळतं. आर्सेनिकमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. तसंच डायबिटीससारखे आजार होण्याचा देखील धोका वाढतो. आता भात प्रेमींसाठी शास्त्रज्ञांनी तांदूळ शिजवण्याची एक नवीन पद्धत शोधली असून तांदळातील 74 टक्के आर्सेनिक काढून टाकण्यात यश मिळालं आहे.
तांदळाचे पीक येण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. पण पाणी दिल्यानंतर जमिनीतील आर्सेनिक पाण्यात मिसळलं जातं व तांदळाचे पीक आर्सेनिक शोषून घेतं. इतर धान्यांच्या तुलनेत आर्सेनिक शोषून घेण्याची तांदळाची क्षमता दहा पटींनी जास्त असते. त्यामुळे तांदूळ खाणं लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकत.
सध्या पाॅलिशिंग करण्याच्या पद्धतीमुळे तांदळातील बऱ्याच प्रमाणात आर्सेनिक निघून जातं. पण सोबतच पौष्टिकतत्वे देखील नष्ट होतात. मात्र शास्त्रज्ञांनी आता नवीन पद्धत शोधली असून त्यामुळे तांदळातील आर्सेनिक देखील निघून जातं आणि पौष्टिकतत्वे देखील जवळपास तशीच राहतात.
काय आहे नेमकी ही पद्धत
जर तुम्हाला एक कप तांदूळ शिजवायचा असेल, तर त्यासाठी चार कप पाणी उकळवा व त्यात तांदूळ टाका. तुम्हाला पुन्हा हे पाणी पाच मिनिटे उकळावे लागेल.
त्यानंतर उकळलेले पाणी ओतून द्यायचं आहे कारण या पाण्यात तांदळातील आर्सेनिक उतरलेलं असतं. पुन्हा दोन कप पाणी तांदळात ओतून शिजवायला ठेवायचं.
अशाप्रकारे जर तुम्ही तांदूळ शिजवले तर तर पोषकतत्व देखील टिकून राहतात तसेच आर्सेनिक देखील मोठ्या प्रमाणात निघून जातं.