आपला भारत देश हा अगदीच प्राचीन देश आहे हे आपल्याला ठाऊक आहे. अर्थातच या गोष्टीमुळे भारताला कमालीचा मोठा गौरवशाली इतिहास आहे. यात मग भारतात अनेक पिढ्या, राज्ये, साम्राज्ये, राजे, महाराजे, लढाया आणि अशा अनेक गोष्टी होऊन गेल्या. यातील आपण सर्वच गोष्टी लगेच पाहू शकत नाही, मात्र आज आपण अशा एका सातवाहन या साम्राज्याबद्दल किंवा या काळाबद्दल किंवा राजघराण्याबद्दल जाणून घेऊयात, कारण आपण अनेक वेळा याबद्दल ऐकत असतो. परंतु आपल्याला बहुतेक गोष्टींचा पुरेसा संदर्भ नसतो.
सुरुवात
तर साधारणपणे सातवाहन हे राजघराणं इ. स. पू. २३० ते इ. स. २२० या कालखंडात होतं. हे राज्य दख्खनच्या पठारावर वसलेलं होतं. परंतु आतापर्यंत सीमा आणि भौगौलिक परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदलली आहे कारण तेव्हाचं सातवाहन साम्राज्य म्हणजे सध्याचं महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश याचा काही भाग असं आपण म्हणू शकतो. तर पैठण ही सातवाहन राज्याची राजधानी होती.
सातवाहन या राज्याचा संस्थापक राजा हा चंद्रवंशी यादव कुळातील सिमुक हा होता. याचे काही संदर्भ हे जुन्नर जवळील नाणेघाट लेण्यांमध्ये कोरलेल्या नावांमध्ये आढळतात आणि विशेष म्हणजे त्यावेळी असलेल्या नावांना पुढे आईचं नाव लावलं जायचं, जसं की सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी.
…आणि २००७ साली हे बनलं जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य!
प्रभाव
जर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला किंवा दक्षिण भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सातवाहन हे घराणं म्हणजे पहिलाच राजवंश असं आपण म्हणू शकतो. एकूण विचार केला तर महाराष्ट्रासाठी हा काळ प्रभावी आणि भरभराटीचा ठरला होता. सांस्कृतिक दृष्टीने देखील महाराष्ट्राला चांगलं वैभव या काळात प्राप्त झालं होतं. याच काळात अनेक लेण्या, गुफा, घाट, किल्ले बांधले. सातवाहन काळात त्यांनी अनेक जैन आणि बौद्ध मंदिर बांधली. त्यांनी जैन आणि बौद्ध धर्माचा प्रसार केला.
जगाला हसवणाऱ्या मिस्टर बीन बद्दल तुम्हाला ‘ह्या’ गोष्टी माहीत आहेत का?
ऱ्हास
त्यानंतर हे राज्य एवढं मोठ झालं की, ‘ज्या राज्याचे घोडे तीन समुद्राचे पाणी पितात ते सातवाहन राज्य’ असं म्हटलं जाऊ लागलं. या सर्व गोष्टींमुळे या राज्याला अनेक संशोधक महाराष्ट्राचे राजे देखील मानतात. पुढे तिसऱ्या शतकामध्ये अनेक छोट्या छोट्या राज्यांचा उदय होऊ लागला आणि सातवाहन साम्राज्याचा ऱ्हास होऊ लागला, या साम्राज्यात जवळपास ३० राजे होऊन गेले.