बहुप्रतीक्षेत असलेलं व्हाट्सअपचं ‘डिसअॅपेरींग मेसेजेस’ नावाचं फीचर अखेर सर्वांसाठी उपलब्ध झालं आहे. व्हाट्सअपवरचं चॅटिंग जास्तीत जास्त वैयक्तिक असावं, यासाठी व्हाट्सअपने ही सुविधा दिली आहे. हे सुविधा चालू केल्यावर सात दिवसानंतर तुम्ही केलेली व्हाट्सअप चॅट आपोआप डिलीट होते.
‘डिसअॅपेरींग मेसेजेस’ नावाचं फिचर वापरण्यासाठी तुम्हाला व्हाट्सअप अपडेट करावं लागेल. त्यानंतर हा पर्याय चालू करावा लागेल.
हा पर्याय चालू केल्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्याला मेसेज कराल तेव्हा तो मेसेज सात दिवसानंतर आपोआप डिलीट होईल. सध्या व्हाट्सअपने मेसेजेस आपोआप डिलीट करण्याची मर्यादा ७ दिवसांची दिली आहे.
व्हाट्सअपने ही सुविधा वैयक्तिक चॅटसाठी तसेच ग्रुप चॅटसाठी दिली आहे. अर्थात ग्रुप चॅटसाठी ॲडमिनला हा पर्याय सुरू करावा लागेल. तसंच डिसअॅपेरींग मेसेजेस पर्याय सुरू केल्यानंतर चॅटिंग सोबत व्हिडिओ आणि फोटो देखील आपोआप डिलीट होतील.
महत्वाच्या बातम्या – Whatsapp Pay: आता चॅटिंगसोबत व्हाट्सअपच्या मदतीनं करा डिजिटल पेमेंट