पूनम पांडेच्या अश्लील फोटोशूट नंतर मिलिंद सोमण यांच्यावर देखील न्यूड फोटोशूटसाठी गोवा पोलिसांनी कारवाई केली आहे.
गेल्या 4 नोव्हेंबर रोजी मिलिंद सोमण यांनी आपल्या 55व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गोवा बीचवर विनावस्त्र धावतानाचा फोटो “55 and running!” अश्या शीर्षकासोबत सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर गोव्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी या फोटोशूटवर आक्षेप घेतला. तसेच नेटकर्यांनी पूनम पांडे यांच्यावर जशी त्वरित कारवाई झाली तशीच मिलिंद सोमण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
Happy birthday to me ?
.
.
.
55 and running ! ? @5Earthy pic.twitter.com/TGoLFQxmui— Milind Usha Soman (@milindrunning) November 4, 2020
यानंतर गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज सिंग यांनी मिलिंद सोमण यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 294 आणि IT कायद्यातील कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. या अगोदर पूनम पांडे या अभिनेत्रीने गोव्यातील धरणावर न्यूड फोटोशूट आणि व्हिडियोशूट केलं होते. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिच्यावर अश्लीलता पसरवण्याचा आरोप केला होता. तर गोव्याच्या फॉर्वर्ड पक्षाच्या महिला विंगने पूनम पांडेवर गुन्हा नोंदवला होता.
यासाठी पूनम पांडेला अगौदा इथल्या रिसॉर्टमधून पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान कॅनकोना इथल्या न्यायालयानं याप्रकरणी पूनम पांडेला जामीन मंजूर केला आहे.
नक्की वाचा –
बिरसा मुंडा यांचा पुतळा समजून दुसऱ्याच पुतळ्याला घातला अमित शहांणी हार!
“मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान केलं”; खडसे यांची फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका
मराठा मशाल मोर्चा मातोश्रीवर धडकणार का?
फॅक्ट चेक: जगभरात नाही तर महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून केला जातो!