५ नोव्हेंबरपासून राज्यभरातील सिनेमागृहे ५० टक्के प्रेक्षकसंख्येच्या क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या सिनेमांनी प्रदर्शित होण्याची नवीन ठरवली आहे. यात प्रामुख्याने ‘८३’ आणि ‘सूर्यवंशी’ या दोन्ही सिनेमांना प्रमोशन करण्यासाठी फार कमी वेळ मिळाला आहे. यामुळे हे चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. हे दोन्ही सिनेमे आता २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ महिने सिनेमागृहे बंद होती. लॉकडाऊन होण्याच्या आधी सिनेमागृहामध्ये सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असणारा ‘विजेता’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. यासोबत मागील वर्षी विवेक ओबेरॉय याची मुख्य भूमिका असणारा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा हिंदी सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता. मात्र हे दोन्ही सिनेमे पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत. तसेच ‘मलंग’ आणि ‘खालीपिली’ हे सिनेमेदेखील पुन्हा प्रदर्शित होतील.
सध्यातरी एसएस राजमौली यांचा बाहुबली (द बिगनिंग) आणि बाहुबली (द कन्क्लूजन) हे दोन्ही भाग सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहेत. यातील बाहुबली (द बिगनिंग) शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आलाय, तर दुसरा भाग बाहुबली (द कन्क्लूजन) पुढच्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.
रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी प्रदर्शित होण्याची तारीख २६ जानेवारी जाहीर केली आहे. मात्र, रणवीर आणि दीपिका यांची जोडी असणारा ८३ हा सिनेमा नाताळमध्ये प्रदर्शित होणार होता, आता याही सिनेमाने आपली तारीख पुढे ढकलेली आहे.
नक्की वाचा- Money Heist रहस्यमय कथा
“हलाल”- सामाजिक संदेश देणारा सिनेमा!