येणाऱ्या ११ नोव्हेंबरला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याला निघणार आहे. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की “ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्मा सुद्धा संघासोबत असू शकेल” किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता.
ऑस्ट्रेलिया सोबत भारतीय संघ वनडे आणि टी -२० सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ कसोटी सामने देखील खेळणार आहे. वनडे सामन्यात रोहितला विश्रांती दिली जाईल. तोपर्यंत रोहित पूर्णपणे फिट होईल. टी -२० सामन्यात तो आगमन करेल. अशी माहिती सूत्रांनी दिली. “रोहितला दुखापत झाली असली, तरी त्याने आयपीएलच्या दोन सामन्यांमध्ये खेळून तंदुरुस्त असल्याचा दावा केला आहे” म्हणून रोहितचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नक्की विचार केला जाईल.
कसा असेल ऑस्ट्रेलिया दौरा?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतर भारतीय संघाला अगोदर १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. नंतर २७ नोव्हेंबरपासून ३ सामन्यांना सुरुवात होईल. २७ तारखेला वनडे मालिकेला सुरुवात होईल. तर टी-२० सामना ४ डिसेंबरपासून आणि १७ डिसेंबरपासून कसोटी सामने खेळायला सुरु होतील.
महत्वाच्या बातम्या – त्या दिवशी विराट वडीलांच्या अंत्यसंस्काराला गेला नाही, पण मैदानात उतरला आणि…