अमेरिकेमध्ये बायडन यांना बहुमत मिळून सत्तांतर झालेलं दिसतं आहे. याबाबत सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. यावरून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट एक खोचक कॅप्शन टाकून रिट्विट केलं आहे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांना आघाडी मिळून देखील “मी निवडणूक जिंकली आहे” (I WON THIS ELECTION, BY A LOT) असं ट्विट केलं होतं. याच ट्विटला सत्यजित तांबे यांनी, ‘हे म्हणजे “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.” सारखंच झालं’ अशी खोचक कमेंट करून जवळजवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेम धरला.
हे म्हणजे
"मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन"
सारखंच झालं… https://t.co/OD3e8Ttu9U
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) November 7, 2020
या ट्विटवर अनेक लोकांनी मजेशीर कमेंट, मीम पोस्ट केल्याचं दिसत आहे. तसंच अनेक लोकांनी हे ट्विट रिट्विट देखील केलं आहे.
महत्वाच्या बातम्या – बायडन यांनी एवढ्या गोळ्या, इंजेक्शन टोचुन घेतलेत की ते १ वर्षापेक्षा जास्त जगणार नाहीत -कंगना