अमेरिका निवडणुकीच्या मोठ्या नाट्यमय परिस्थितीनंतर अखेर जो बायडन हे विजयी झाले. बायडन आता अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनतील. बायडन यांनी रविवारी व्हाईट हाऊस सांभाळण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. मात्र अजून देखील डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पराभव मान्य झाल्याचं दिसत नाही. दुसऱ्या बाजूला बायडन आणि कमला हॅरिस यांनी राजकारणाची सुरुवात म्हणून, एक BuildBackBetter.com नावाची वेबसाईट तयार केली आहे. त्याचबरोबर @Transition46 हे ट्विटर हॅण्डल देखील चालू केलं आहे.
The task ahead of the Biden-Harris administration is unlike any other in our history.
In preparation, our transition will be led by experts, by science, and with character—ensuring that we will be ready to lead on Day One.
— The White House (@WhiteHouse) November 8, 2020
त्यामुळे बायडन आणि कमला हॅरिस यांनी आपल्या कामाला सुरुवात केल्याची चिन्ह अमेरिकी जनतेला दिली आहेत. त्यांच्या वेबसाईट सुरु करण्याचे चार प्रमुख मुद्दे आहेत, यामध्ये कोरोना, आर्थिक परिस्थिती, जातीय समानता आणि हवामान बदल हे मुद्दे आहेत. या गोष्टींशी लढण्यासाठी बायडन यांची एक टीम काम करेल.
याबाबत अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी बायडन आणि कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, “आमचे जरी वैचारिक मतभेद असले तरी, राजनैतिक मतभेद असले तरी बायडन हा चांगला माणूस आहे. देशाच्या भवितव्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू.”
आता डोनाल्ड ट्रम्प कधी हार मान्य करतात? आणि अमेरिकेचं राजकारण कोणत्या दिशेला वळण घेणार? हे प्रश्न लोकांसमोर पडले आहे.
हे पण वाचा: निवडणूक हारल्यानंतर ट्रंम्प यांच्या जावयाने त्यांना “काय” सल्ला दिला?
फॅक्ट चेक: डाॅ. मनमोहन सिंग यांना जो बायडन यांच्या शपथविधीचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण?