इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली असून पोलीस आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. यानंतर अर्णब गोस्वामी यांचं समर्थन करण्यासाठी कंगना राणावत ने पुढाकार घेतला आहे.
त्यासंदर्भात तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तुम्ही अर्णब गोस्वामींना जेवढं त्रास द्याल तेवढेच कणखर होऊन ते बाहेर येतील तसेच इतिहासात अर्णब यांना एक हीरो म्हणून ओळखल जाईल असं म्हटलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1325351677935775745
बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीया, चाईल्ड ट्रॅफिकिंग आणि सोनिया गांधी यांचं खरं नाव घेतल्यामुळे अर्णब गोस्वामींना त्रास दिला जात असल्याचं कंगणाने म्हंटल आहे तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींवर होत असलेल्या कारवाईवर ही तिने आक्षेप घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या – ‘बायडन यांनी एवढ्या गोळ्या, इंजेक्शन घेतलेत की ते १ वर्षापेक्षा जास्त जगणार नाहीत, कंगना राणावत
पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो, पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना? कंगनाने दिली प्रतिक्रिया