सुपरनोव्हाज संघाने महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा सलग दोन वेळा जिंकली आहे. यावेळी हो स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकण्याच्या दिशेने सध्या सुपरनोव्हाज संघ वाटचाल करत आहे. या संघाने स्पर्धेत आपले पारडे नेहमीच जड ठेवले आहे. आज ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हाज या दोन संघामध्ये फायनल सामना होणार आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये सुपरनोव्हाज संघाने ट्रेलब्लेझर्स संघावर मात केली होती. प्रथम फलंदाजी करत सुपरनोव्हाज संघाने ६ बाद १४६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रेलब्लेझर्स संघाने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १४४ धावाच केल्या. सुपरनोव्हाजने फक्त दोन धावांनी ट्रेलब्लेझर्स संघावर विजय मिळवला.
सुपरनोव्हाज संघाने सलग तिसऱ्यांदा महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आज होणारा सामना हा खूप रोमांचक ठरेल. सुपरनोव्हाज संघ सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल.
महत्वाच्या बातम्या – IPL: इतिहास रचत दिल्लीचा पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश…