जळगाव: एसटी कंडक्टर मनोज चोधरी यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करताना त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे की, “एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे.
यासोबत माझ्या आत्महत्येचा आणि घरच्यांचा काहीही संबंध नाहीये. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी विमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. ही विनंती,” असं देखील चौधरी यांनी लिहलं आहे.
यानंतर ही सुसाईड नोट मनोज चौधरी यांच्याच हस्ताक्षरातील हो नोट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र यानंतर परिवहन मंत्री यांनी एसटी कर्मचाऱ्यांना एका महीन्याचा पगार लगेच देणार असुन दिवाळीसाठी आणखी एका महीनाचा पगार दिवाळीपुर्वी जमा करणार असल्याचं सांगितले आहे. यासोबत काही झालं तरी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका असं देखील ते म्हणाले.
दरम्यान यावर बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर निशाना साधला आहे, गेल्या दोन दिवसाच पगार मिळत नसल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, तरी ठाकरे सरकार झोपले आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या – एसटी महामंडळ बसस्थानके गहाण ठेवण्याच्या विचारात…