• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Saturday, June 10, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

ऑनलाईन शिक्षणाने घेतला अजून एका विद्यार्थीनीचा बळी!

by The Bhongaa
November 10, 2020 - Updated on November 11, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

“मी माझ्या मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरत नाही. मी माझ्या घरात होणाऱ्या अनेक खर्चांना कारण आहे. माझे शिक्षण एक ओझे आहे. मला माझ्या घरच्यांसाठी ओझे नाही बनायचे. मी शिक्षणाशिवाय जिवंत राहू शकत नाही.” असे म्हणत तेलंगना मधील ऐश्वर्या रेड्डी या सगळ्यात हुशार विद्यार्थीनीने आत्महत्या केली.

19 वर्षीय ऐश्वर्या तेलंगना मधील ले़डी श्रीराम कॉलेजची टॉपर विद्यार्थीनी होती. ऐश्वर्या BSc मैथमैटिक्स मधून सध्या शिक्षण घेत होती. तिला बारावीत ९८.५ टक्के मिळाले होते.  लॉकडाउनच्या काळात कॉलेज बंद झाले म्हणून ऐश्वर्या घरी आली. त्यानंतर तिचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. तिच्या फोनमुळे तिला ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हते. तसेच तिला अभ्यासात अनेक अडचणी येत होत्या. अभ्यासासाठी तिने आपल्या वडिलांजवळ लॅपटॉपची मागितला होता.

परंतु, ऐश्वर्याच्या वडिलांना आपल्या परिस्थितीमुळे लॅपटॉप देणे शक्य झाले नाही. ऐश्वर्याच्या वडिलांनी लॉकडाऊनच्या आधी मोटार दुरुस्तीचे दुकान टाकले होते. पण लॉकडाउनमुळे ते लगेच बंद करावे लागले. यामुळे त्यांच्या घरात पैसे येणे बंद झाले. ऐश्वर्याची आई शिवणकाम करुन घर चालवते.

ऐश्वर्याच्या घरच्यांना लॉकडाउनमध्ये अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. या सगळ्या कारणांमुळे ऐश्वर्याच्या अभ्यासासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपची सुविधा करणे हे तिच्या वडिलांना शक्य झाले नाही. त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलीचे शिक्षण याच अडचणीमुळे बंद केले. तिच्यासाठी त्यांनी घरातील सगळे दागिने घाण ठेवले होते. परंतु ते तिला फक्त सातवी पर्यंतच शिकवू शकले.

संबंधितबातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

ऐश्वर्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या व्हॉट्सॲप वर ‘हॉस्टेल रिकामे करा’ अश्या आलेल्या मेसेज नंतरच शांत झाली होती. हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा फक्त पहिल्या वर्षातील विद्यार्थीनींसाठी होती. आपल्या अडचणी बघता ऐश्वर्याच्या घरच्यांनी १४ सप्टेंबर रोजी सोनू सूदला ही मदतीसाठी पत्र लिहले होते. तर ऐश्वर्याने देखील आय.टी. मंत्री केटी रामारावकडे मदत मागितली होती. तसेच तिने भारत सरकारच्या साइंस एंड टेक्नोलॉजी विभागाकडे देखील स्कॉलरशिपसाठी अर्ज भरला होता.

शेवटी अश्या अनेक अडचणीवर मार्ग न मिळाल्याने या सगळ्याला त्रासून ऐश्वर्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. सध्या स्कॉलरशिप विषयावरुन काँग्रेसच्या विद्यार्थि संघटनेने केन्द्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. आर.पी. निशंक यांच्यावर आरोप लावले आहेत. ऐश्वर्याला स्कॉलरशिप मिळणार होती परंतु त्यासाठी वरून फंड पाठवण्यात आला नाही. तो जर वेळेवर पोहचला असता तर आज ऐश्वर्या जिवंत असती असे अनेक प्रश्न विद्यार्थी संघटनेने उपस्थित केले आहेत.

या अगोदर हि ऑनलाईन  शिक्षण घेता न आल्याने विद्यार्थ्यांनी चूकीची पाऊले उचल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे ऑनलाईन शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी घेतलेला योग्य निर्णय आहे का यावर अजून ही प्रश्न चिन्ह आहे. 

महत्वाच्या बातम्या –

बारामती: रिलायन्स मॉलवर ग्राहक पंचायतीकडून कारवाई…

 बारामती: पहाटे घराला लागली आग, लोकांना सुखरुप काढण्यास अग्निशमन दलाला यश…

“या” गोष्टीमुळे बारामती घंटागाड्यांवर परिवहन अधिकाऱ्यांची कारवाई

Tags: ऐश्वर्या रेड्डीऑनलाईन शिक्षणडॉ. आर. पी निशंकतेलंगानाले़डी श्रीराम कॉलेजविद्यार्थि संघटनस्कॉलरशिप
ShareTweetSendShare
Previous Post

बारामती: रिलायन्स मॉलवर ग्राहक पंचायतीकडून कारवाई…

Next Post

‘ओबीसी हक्कांचं संरक्षण करू शकत नसाल तर मंत्री कशाला झालात’; प्रकाश आंबेडकरांची ओबीसी मंत्र्यांवर टीका

Related Posts

ताज्या बातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

May 13, 2023
ताज्या बातम्या

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

May 1, 2023
Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories