बारामती | तांदुळवाडी रोड येथे काल पहाटे साडेचारच्या सुमारास येथील गुरुकृपा कॉलनी जिजामाता नगर येथे डॉ. भगवान शंकर माळी यांच्या दोन मजली इमारतीला आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला.
पहाटेच्या सुमारास काही नागरिक व्यायामाला जात असताना, इमारतीला आग लागल्याचे त्यांना दिसून आले, त्यांनी ताबडतोब 101 क्रमांकाला संपर्क करून अग्निशमन दलाशी संपर्क साधला, घटनेची माहिती मिळताच बारामती नगरपरिषदचे अग्निशमन दल काही क्षणातच तेथे दाखल झाले, अग्निशमन दलाला लागलेली विझवण्यात तसेच दुसऱ्या मजल्यावरील लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाने माहिती मिळताच अवघ्या काही वेळातच दाखल होऊन लागलेली आग विझवून नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढले त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, बारामती नगरपरिषद अग्निशमन दलाचे जवान चालक निवृत्ती जाधव, फायरमन उमेश लालबिगे, फायरमन निखिल कागडा, चालक राजेंद्र मिरगुंडे, फायरमन प्रदीप लालबिगे, फायरमन मोहन शिंदे, यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जलद गतीने आग विझवली व नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढले.
महत्वाच्या बातम्या – “या” गोष्टीमुळे बारामती घंटागाड्यांवर परिवहन अधिकाऱ्यांची कारवाई