डिजिटल पेमेंट अॅप असणाऱ्या गूगल पे वर कंपिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) कथितरित्या अयोग्य व्यवसाय पद्धतीचा अवलंब केल्याचा ठपका लावला आहे. यासाठी त्यांनी “कंपनीने कायद्याच्या कलम ४ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचं आयोगाचं प्राथमिक मत असल्याचे म्हणत इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलच्या विरोधात सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.
सीसीआयच्या म्हणण्यानुसार गुगल अयोग्य व्यवसाय पद्धतीचा अवलंब करत आहे. यावर “गुगल सध्या जे काही करत आहे ते अयोग्य आहे आणि त्यांनी भेदभाव करणाऱ्या अटी शर्थी ठेवल्या आहेत. याअंतर्गत, गुगल पेच्या स्पर्धक अॅप्सना बाजारात प्रवेश प्रदान केला जात नाही, असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. असे सीसीआयने म्हणले आहे.
सीसीआयने गूगल सोबत अल्फाबेट इंक, गुगल एलएलसी, गुगुल आयर्लंड लिमिटेड, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याविरोधात देखील चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान यावर प्रतिक्रीया देत गुगलने “गूगल पे अत्यंत स्पर्धात्मक पद्धतीने चालविले जात आहे आणि ग्राहक त्याची सेवा साधी आणि सुरक्षित असल्यामुळे त्याला प्राधान्य देतात हेच त्याचं यश आहे, हे तपासणीदरम्यान दिसून येईल,” असे सांगितले आहे.