सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. बिहार जनता नक्की कोणाच्या नावाने कौल देईल याकडे सगळ्यांचे लक्ष असताना बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी तेजस्वी यादव यांच्यावरील विश्वास व्यक्त केला आहे.”बिहारमध्ये सर्वात वेगवान तेजस्वी. तेजस्वींच्या समोर पंतप्रधान, त्यांची फौज, केंद्रीय मंत्रिमंडळ, नितीश कुमार यांचं सरकार. सत्ता, संपत्ती, ताकद संपूर्ण होतं. पण एका मुलानं. एका तरुणानं ज्या पद्धतीनं सगळ्यांसमोर आव्हान उभं केलं. बिहारमध्ये ज्याप्रमाणे तो लढत आहे”.
“मला वाटत हा एक चांगला संकेत आहे. जंगलराजविषयी बोललं जात होतं. १५ वर्षांपासून नितीश कुमार यांचं सरकार होतं. मग कोणतं जंगलराज होतं. मला वाटतं लोक जंगलराज संपवून आज तेजस्वींच्या नेतृत्वात मंगलराज सुरू होईल,” असे माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले आहेत.
तसेच त्यांनी “निकाल पूर्ण यायचे आहेत. जे कल पाहिले आहेत. त्यावरून एका तरुण नेत्यानं. त्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन जी ताकत उभी केली आहे. आता अटीतटीची लढत आहे. मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल, तेव्हा लोकं जंगल राज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू झालेलं असेल,” असा विश्वास तेजस्वी यादवांप्रती दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बारामती: पहाटे घराला लागली आग, लोकांना सुखरुप काढण्यास अग्निशमन दलाला यश…
केंद्र सरकारमुळेच काश्मिरी तरूण बंदूका हाती घेत आहेत -मेहबुबा मुफ्ती
“या” गोष्टीमुळे बारामती घंटागाड्यांवर परिवहन अधिकाऱ्यांची कारवाई