साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोड कामगार अनेक भागात दाखल झाले आहेत, आणि त्यांच्या सोबत त्यांची लहान मुले ही आहेत, ज्या वयात शाळेत जायला हवं त्या वयात ही मुलं आई वडीलांसोबत कामासाठी जात आहेत.
या बाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी “माझ्या मतदारसंघातील काही ऊसतोड कामगार कुटुंबांची भेट झाली असता, त्यांच्या लहान मुलांना शाळेऐवजी ऊसाच्या फडात पाहून वाईट वाटलं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे जी या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी लेखणी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागणार आहे, आणि आपण ते द्याल, असा विश्वास आहे” असे ट्विट करत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणाची मागणी केली आहे.
माझ्या मतदारसंघातील काही ऊसतोड कामगार कुटुंबांची भेट झाली असता त्यांच्या लहान मुलांना शाळेऐवजी ऊसाच्या फडात पाहून वाईट वाटलं. सामाजिक न्यायमंत्री @dhananjay_munde जी या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी लेखणी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आणि आपण ते द्याल, असा विश्वास आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 11, 2020
यावर धनंजय मुंडे यांनी” ऊसतोड कामगारांची मुलं फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील,’ असे तातडीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उत्तर दिले आहे.
तसेच, स्व.गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या मुलांची शैक्षणिक परवड थांबून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपाययोजना करत आहोत असेही धनंजय मुंडे म्हणाले.
. @RRPSpeaks जी, आपण ऊसतोड कामगारांच्या लेकरांची परवड व शैक्षणिक नुकसान कायमचे थांबावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या दृष्टीने स्व.गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना करत आहोत. ही मुलं फडात नाही तर लवकरच चांगल्या शाळेत दिसतील! https://t.co/Jqc0kRgFJU
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 11, 2020
यावर रोहित पवार यांनी मुंडे यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या – अर्णबची खरंच चौकशी करण्याची गरज आहे का? -न्यायालयाचा सवाल