गेल्या आठवड्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याबाबत आज सर्वोच्च नायायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होती. याबाबत अर्णबचे वकील हरीश साळवे यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. “जर न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातलं नाही तर याला वेगळं वळण मिळू शकतं. तुमची विचारधारा कोणतीही असली तरी स्वातंत्र्याचं रक्षण नाही तर कोण करणार?” असं मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मांडलं.
“मी देखील त्यांचा चॅनल पाहत नाही. ज्याची त्याची विचारधारा वेगळी असू शकते, मात्र न्यायालय जामीन देत नाही म्हणून त्याला तुरुंगात टाऊन वेगळा संदेश समाजात जातोय. एक निष्पक्ष न्याय झाला पाहिजे आणि राज्य सरकारने असं व्यक्तिगत कुणाला लक्ष केलं तर एक कठोर संदेश बाहेर जाईल.” असं देखील न्यायमूर्ती म्हणाले.
अर्णब गोस्वामी यांना खरंच ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे का? कारण कुणा व्यक्तीच्या खासगी स्वातंत्र्यावर आपण घाला घालू शकत नाही.असा सवाल यावेळी उपस्थित केला.
तथ्यांकडे दुर्लक्ष – साळवे
ही घटना २०१८ मधली आहे, मात्र आता सरकार द्वेषामुळे तथ्यांकडे दुर्लक्ष करत बदला घेत आहे आणि अधिकाराचा गैरवापर करत असल्याचं आरोप वकील हरीश साळवे यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या – Arnab Goswami Arrest: मुंबई हायकोर्टानं अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला
अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली ते समाज सहन करणार नाही -राम कदम