बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप संयुक्त जनता दल आघाडीने बाजी मारली आहे, सुरुवातीस एकतर्फी वाटलेल्या आणि नंतर विलक्षण चुरशीच्या ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच (NDA) ने बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता कायम राखली आहे. बिहार मध्ये यंदाची दिवाळी एनडीएसाठी गोड ठरली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरू होती. २४३ जागांचे निकाल हाती असून त्यापैकी १२५ जागा एनडीएला मिळाल्या.
या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपने, ४३ जागा जदयूने, तर मित्र पक्षाने ८ जागांवर बाजी मारली. बिहार निवडणुक विजयानंतर अनेकांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. यासोबत भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसने महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रातदेखील जनतेच्या ‘घड्याळाचे’ काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन,” असं ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
काँगसने महाराष्ट्रात "हातात" "धनुष्यबाण" धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला…
आता…
महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या "घड्याळाचे"
काय सांगावे टायमिंग…?पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच!
त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/e0kK3EqfPg— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 11, 2020
तसेच भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेल्या ‘जंगलराज का युवराज’ला बिहारच्या जनतेनं नाकारलं. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत ‘जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज’ युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है,” असंही ते ट्विटर वरून म्हणाले.
महत्वाच्या बातम्या – ‘ओबीसी हक्कांचं संरक्षण करू शकत नसाल तर मंत्री कशाला झालात’; प्रकाश आंबेडकरांची ओबीसी मंत्र्यांवर टीका