बिहार विधानसभा निवडणुकीच्या चांगल्याच चर्चा रंगल्या असताना आमदार रोहित पवार यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे. बिहार निवडणूक बघता तेजस्वी यादव यांचंही कौतुक केलं आहे. “भाजपा ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं”असा आरोप रोहीत पवारांनी भाजपावर केला आहे.
“बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तींशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत. यातून बोध घेऊन नितीश कुमारजी हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की, काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी, असे ट्विट करत रोहित पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
झालेल्या निवडणुकीतून बोध घेऊन नितीश कुमार जी हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी. असे पवार नितीश कुमारांना म्हणले आहे.
बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले @yadavtejashwi हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2020
“नुकत्याच जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त अर्थात जदयूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचं दिसून आलं. मागील १५ वर्षांपासून बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या जदयूपेक्षा भाजपा जास्त जागा जिंकल्या. तर लोक जनशक्ती पार्टीमुळे जदयूला अनेक ठिकाणी फटका बसला. असे आपल्या ट्विट मध्ये म्हणत रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली.
महत्वाच्या बातम्या – भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेल्या ‘जंगलराज का युवराज’ला बिहारच्या जनतेनं नाकारलं -आशिष शेलार