अमेरिका | ७ नोव्हेंबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडन यांची निवड झाली. मात्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पराभव झाला हे अजुन मान्य नाही. विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या २४४ वर्षाच्या इतिहासात पराभवानंतर पहिल्यांदाच कोणत्या राष्ट्रपती व्हाईट हाऊस सोडायला नकार दिला आहे.
ज्यो बायडन ह्यांनी २७० इलेक्टोरल व्होट मिळवत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. निवडणूक होण्याच्या आधी ज्यो बायडन यांना विचारण्यात आलं होते की, निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक हारल्यावर व्हाईट हाऊस सोडलं नाही तर तुम्ही काय करणार यावेळी ते म्हणाले होते की, “सेना ही निश्चित करेल असा राष्ट्रपती आपल्याला नकोय आणि त्यांना व्हाईट हाऊस मधून सेनाच बाहेर काढेल”
यामुळे शपतविधीनंतर नेमकं काय होणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या – अमेरिका इलेक्शन : ट्रम्प यांनी का घेतली कोर्टात धाव?