इंटेरियर डिझाईन अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे गेल्या सात दिवसापासून अटकेत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. तसेच न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर या प्रकरणातील गोस्वामींसह आरोपी नितेश सारडा आणि फिरोज शेख यांचा ही जामीन मंजूर केला आहे.
तळोजा कारागृहातून सुटका होताच अर्णब गोस्वामी थेट आपल्या न्यूजरूम मध्ये पोहोचले, आणि पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्णब गोस्वामी यांनी आव्हान दिले आहे.
उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असेही अर्णब गोस्वामी म्हणाले. तसेच आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तुरूंगाच्या आतूनही मी वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,” असेही ते म्हणाले.
यावेळी न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्याप्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले, तसेच अर्णब गोस्वामी यांना अखेर जामीन मजूर केल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं.