“मतदार हा कोणाचा गुलाम नाही.” अशी प्रतिक्रिया बिहारच्या निकालानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली. त्यामुळे बिहारनंतर आता बंगालमध्ये देखील निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत एनडीएने विजय मिळवला असला तरी खूपच कमी फरकाने हा विजय त्यांना मिळाला आहे. यामध्ये पाच जागा एमआयएम पक्षाला मिळाल्या आहेत.
गेल्या निवडणुकीत आम्ही सहा जागा लढवल्या होत्या मात्र त्या जागांपैकी पाच जागांवर आमचं डिपॉझिट जप्त झालं होतं. मात्र यावेळी आम्ही जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिलं. त्यामुळे लोकांनी प्रेम देऊन आम्हाला निवडून दिलं आहे. यापुढेही आम्हाला मेहनत करायची आहे आणि त्यामुळे आत्ता पश्चिम बंगालमधील लोकांशी चर्चा करून आम्ही निवडणुकीचा निर्णय घेणार आहोत.