सध्या देशात फेक न्यूजची समस्या गंभीर झाली आहे. कोरोना काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या आहेत. लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून सरकारकडून वेळोवेळी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आता सोशल मीडियावर 1 डिसेंबरपासून देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची पोस्ट व्हायरल होत आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय आहे?
सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच सणासुदीचा काळ असल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळं 1 डिसेंबरपासून देशात लाॅकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे.
मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याचं प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पण दुसरीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची बाब खरी आहे. तसंच सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. एवढेच नव्हे तर अनेक तज्ञांनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवलीय. त्यामुळे मास्क वापरणं, सोशल डिस्टंसिंग, साबण पाण्याने हात धुणं यासारख्या गोष्टी पाळणं गरजेचे असणार आहे.
महत्वाच्या बातम्या – फॅक्ट चेक: डाॅ. मनमोहन सिंग यांना जो बायडन यांच्या शपथविधीचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण?