महाराष्ट्रातील राजकारण सध्या आरोप प्रत्यारोपामुळे चांगलंच पेटलेलं आहे. यात अनेक आरोप, प्रत्यारोप होत असताना दिसत आहेत. यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील उडी घेतली आहे. “ठाकरे सरकार हे भूखंडाचे श्रीखंड लाटण्यात गुंतले आहे.” असं खळबळजनक विधान त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर “मी विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्र्यांनी द्यावी आणि हिंमत असेल तर मला अडवून दाखवा.” असं देखील ते म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी या गोष्टी बोलल्या.
सोमय्या यांनी दहिसर जामीन घोटाळा मुद्द्याला यावेळी हात घातला आणि त्यावरून आरोप केला. आपल्याकडे या घोटाळ्याची कागदपत्रं आहेत. ही कागदपत्रं राज्यपालांकडे सोपवून तक्रार केल्याचं देखील ते म्हणाले. शिवसेना या मुद्द्यापासून पळण्याचा प्रयत्न करतेय. त्यातील ४० जमिनींपैकी ३० जमिनींच्या नावावर अन्वय नाईक कुटुंबीयांची नावं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
आपण सादर केलेली कागदपत्रं खरी खोटी असल्याची शहानिशा करून मी खोटा असेल तर पोलिसात जाऊन माझ्याविरोधात तक्रार करावी असं देखील ते यावेळी बोलले.
महत्वाच्या बातम्या – फॅक्ट चेक: देशात पुन्हा 1 डिसेंबरपासून लॉकडाऊन; व्हायरल पोस्ट खरी का खोटी?
फॅक्ट चेक: डाॅ. मनमोहन सिंग यांना जो बायडन यांच्या शपथविधीचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण?