भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आता आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. सानिया मिर्झा लवकरच टेनिसवरून उडी घेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. सानिया मिर्झा “एमटीव्ही निषेध अलोन टुगेदर” या वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात आता पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजचा उद्देश टीबी या रोगावर जागरूकता पसरवणे आहे.
सानिया मिर्झा म्हणाली की “टीबी आपल्या देशातील सर्वात जुनी आरोग्य समस्यांपैकी एक आहे. टीबीची नोंद केलेली निम्मे प्रकरणे ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आहेत. आजारपणाचा सामना करण्याची व समज बदलण्याची खूप गरज आहे.”
“टीबी हा धोकादायक आहे आणि साथीच्या रोगाने त्याचा परिणाम आणखी वाईट झाला आहे. टीबी थांबविण्याची लढाई पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाली आहे. यामुळे मला या प्रकल्पात सामील होण्याची प्रेरणा मिळाली. मला आशा आहे की माझ्या उपस्थितीने काही प्रमाणात सकारात्मक बदल घडतील,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली.
५ भागांची ही वेबसीरिज नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एमटीव्ही इंडिया आणि एमटीव्ही निषेधच्या सोशल मीडिया हँडलवर लाँच होणार आहे.