मेसेंजर आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी सोशल मिडाया कंपनी फेसबुकने एक खास फीचर आणले आहे. इन्स्पायर फ्रॉम स्नॅपचॅट हे वैशिष्ट्य असणारे हे फिचर शुक्रवारपासून अमेरिकेसह अन्य बाजारामध्ये उपलब्ध होत आहे. द व्हर्जच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर निवडलेल्या वापरकर्त्यांसाठी फेसबुक एक नवीन “व्हॅनिश मोड” आणत आहे.
हे वैशिष्ट्य भारतातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल की नाही हे फेसबुकने अजुन स्पष्ट केले नाही. या फिचरच्या मदतीने वापरकर्त्यांनी त्यांचे मेसेजेस आणि मल्टीमीडिया पाहिल्यानंतर गायब होऊ शकतील.
इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवर वापरकर्त्यांनी पाठविलेले मजकूर, फोटो आणि व्हॉइस मेसेजेस ‘गायब’ होतील किंवा चॅट बॉक्स बंद केल्यावर अदृश्य होतील. तसेच याच्या मदतीने केवळ वैयक्तिक चॅट करता येईल. यामुळे ह्या नवीन फिचरचा वापरकर्त्यांकडूून कसा प्रतिसाद येतोय हे पाहाव लागेल.