बिहार | देशभरात बिहार निकालाचे वारे वाहत असताना, बिहारामधील बैसाली जिल्हातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलील जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीला न्याय मिळण्यासाठी मुलीची आई रस्त्यावर बसुन न्यायाची मागणी करत आहे.
“आमच्या मुलीवर त्या मुलांनी जबरदस्ती केली, तिने त्यांना विरोध केला म्हणून तिला जिवंत जाळण्यात आलंय. त्या मुलांचं नाव सतिश कुमार राय, चंदन कुमार राय, आहे, आम्हाला न्याय हवा आहे. १७ दिवस होऊन देखील आम्हाला अजुन कसलाच न्याय मिळाला नाही,” अशी प्रतिक्रीया पिडीच मुलीच्या आईने दिली आहे.
दरम्यान, पिडीत मुलीचे जळलेले फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यामुळे काही दिवसांपुर्वी निवडणूकांचे निकाल जाहीर झालेल्या बिहारमध्ये या पिडीत मुलीला न्याय मिळणार का हा प्रश्न देशभरातुन विचारला जात आहे.
महत्वाच्या बातम्या – दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खिलाडी कुमार अक्षयनं ‘रामसेतू’ या नव्या सिनेमाची केली घोषणा.