नुकताच आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. नियमांनुसार भारतीय संघ १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ जोरदार तयारी करत आहे. ऑस्ट्रेलिया संघाने मात्र एक आगळा – वेगळा निर्णय घेतला आहे. चक्क अनवाणी पायांनी मैदानात उतरणार आहेत. कर्णधार पेन याने असे जाहीर केले आहे.
माहीत करून घेऊया यामागील कारण.
२७ नोव्हेंबरपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. सुरुवात वन-डे आणि नंतर टी २० मालिकेने होणार आहे.वन डे सामन्यांच्या अगोदर ऑस्ट्रेलियन पूर्ण संघ मैदानावर अनवाणी याचाच अर्थ पायात बूट न घालताच उतरणार आहे. मैदानात हे सर्व खेळाडू गोलाकार उभे राहणार आहेत आणि त्यानंतर काही वेळाने आत जाऊन बूट घालून सामन्याला सुरुवात करणार आहेत.
या निर्णयाबाबत सांगताना कर्णधार पेन म्हणाला ” जगभरातील वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने हा निर्णय घेतला आहे. आम्ही अनवाणी मैदानात उतरून गोलाकार उभे राहू. प्रत्येक मालिकेच्या सुरुवातीला आम्ही असं करणार आहोत. वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी आम्ही असं करणार आहोत. या आधी आम्ही याची सुरुवात करू शकलो नाही पण आता आम्ही हे नक्की करणार आहोत. हा वर्णभेदाचा निषेध करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असेल” असे टीम आणि कर्णधार पेनने सांगितलं.