कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना एक सोशल मीडिया वापरकर्त्यांने रोहितजी तुम्ही महाराष्ट्राचे भावी नेतृत्व आहात. पुढील खूप वर्ष भाजप सत्तेत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला एनडीए जॉईन करणे आवश्यक आहे,’ असा थेट सल्लाच दिला आहे.
रोहित पवार यांनी या वापरकर्त्याला योग्य उत्तर देत त्याची चांगलीच फिरकी घेत अप्रत्यक्षपणे भाजप वरही निशाणा साधला आहे. पवार हे सोशल मीडियावर जास्त सक्रिय असतात तसेच मतदारसंघात करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या, विविध उपक्रमांच्या माहितीसह राज्य व देशातील राजकारणावर देखील ते अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बोलताना दिसतात.
मात्र रोहित पवार यांच्या एका ट्विट नंतर थेट एनडीए मधे प्रवेश करण्याचा सल्ला एका वापरकर्त्याने दिला आहे त्यावर रोहित पवार यांनी, ‘माझी शैली आवडत असेल तर आपणच एकत्र काम करू यात ना,’ असे म्हणत त्याची चांगलीच फिरकी घेतली, तसेच “लोकशाही मधे कोणताही पक्ष कायम सत्तेत राहत नसतो” असे म्हणत भाजपला ही टोला लगावला. राजकारणात कोणाला कोणते पद द्यायचं हे जनता ठरवत असते. मी कुठल्याही पदासाठी काम करत नाही, पद घ्यायचंच असत तर कदाचित आजवर ते घेतलंही असतं. आणि एनडीएत प्रवेश करायचं म्हणाल, तर आपल्या मताचा आदर आहे, पण लोकशाहीत कोणताही पक्ष कायम सत्तेत नसतो, माझी शैली आवडत असेल तर आपणच एकत्र काम करुयात ना.!’ असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राजकारणात कुणाला कोणत्या पदावर बसवायचं हे जनता ठरवत असते. मी कुठल्या पदासाठी काम करत नाही,तसं असतं तर कदाचित आजवर पदही घेतलं असतं. NDA त प्रवेश करायचं म्हणाल, तर आपल्या मताचा आदर आहे, पण लोकशाहीत कोणताही पक्ष कायम सत्तेत नसतो, माझी शैली आवडत असेल तर आपणच एकत्र काम करुयात ना.! https://t.co/Wuom1NTkvh
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 17, 2020
पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर कर्जत- जामखेड मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांमध्ये जात रोहित पवार यांनी दर्शन घेतले होते. तसे त्याबाबत त्यांनी ट्विट ही केले होते.
राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यासाठी माझ्यासह इतरांनीही केलेल्या विनंतीनुसार आजपासून ती सुरु झाली आहेत. यानिमित्त माझ्या मतदारसंघात पहाटे खर्ड्यात संत सिताराम बाबा व संत गितेबाबा यांच्या समाधीची पूजा करून दर्शन घेतलं. तसंच जामखेडमधील नागेश्वर मंदिर आणि दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं. pic.twitter.com/OIP1fsXZeq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 16, 2020
‘राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यासाठी माझ्यासह इतरांनीही केलेल्या विनंतीनुसार आजपासून ती सुरू झाली आहेत. यानिमित्त माझ्या मतदारसंघात पहाटे खर्ड्यात संत सिताराम बाबा व संत गितेबाबा यांच्या समाधीची पूजा करून दर्शन घेतलं. तसंच जामखेडमधील नागेश्वर मंदिर आणि दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं.’ असे पवार यांनी ट्विट मधे म्हंटले आहे.
त्या ट्विट ला प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने रोहित पवार यांना भाजप पुढील अनेक वर्षे सत्तेत राहील, त्यामुळे तुम्हाला एनडीए जॉईन करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीत तुम्हाला मुख्यमंत्री किंवा दुसर्या कोणत्याही नेतृत्वाची संधी मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती मात्र पवार यांनी भाजप वरही निशाणा साधत त्या ट्विट ला योग्य ते उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या – म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको -महेश टिळेकर
राऊत नेलकटरला घाबरतात आणि वार्ता मात्र तलवारीच्या करतात -निलेश राणे