१७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिवसैनिकानी मंगळवारी शिवतीर्थावर जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.
“आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहिल,” असे संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणले होते.
यानंतर त्यांच्या या वक्तव्याला टोला देत भाजपा नेते निलेश राणे यांनी राऊतांवर चांगलीच टिका केली आहे. आपल्या एका ट्विट मध्ये “संजय राऊत हे नेलकटरला घाबरतात आणि वार्ता मात्र तलवारीच्या करतात,” असे राऊतांप्रती म्हणले आहे.
संज्या नेलकटर ला घाबरतो पण वार्ता करतो तलवारीच्या. https://t.co/AzxvxceoAp
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 17, 2020
महत्वाच्या बातम्या – नवी कोरोना लस ९५ टक्के प्रभावी…