कोरोना विषाणूशी लढतानाच पूर्ण जगाची दमछाक झाली असताना आणखी एक विषाणू आढलल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबाबत अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’ने देखील स्पष्टीकरण दिलं आहे. या विषाणूचं नाव ‘चापरे’ असं आहे. याचे काही रुग्ण दक्षिण अमेरिकेमध्ये सापडले आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्याचं देखील समोर आलं आहे. यापूर्वी हा विषाणू २००४ मध्ये बोलिवियातील चापरे भागात सापडला होता, त्यामुळे याचं चापरे असं नाव पडलं.
काय आहेत लक्षणे?
या आजाराची लक्षणे डेंग्यू, इबोला या आजाराशी साधर्म्य असणारी आहेत. सताप येणे, उलट्या होणे, पोटदुखी, हिरड्यातून रक्त येणे, डोळ्यांची आग होणे अशी याची लक्षणे आहेत.
काय आहेत परिणाम?
या आजारामुळे ताप आला तर तो थेट मेंदूवर परिणाम करतो. यामुळे ब्रेन हॅम्रेजचा धोका असल्याचं देखील तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे लगेच दुसऱ्या एखाद्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला देखील होऊ शकतो. या बातमीमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि लोकं चिंताग्रस्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या – नवी कोरोना लस ९५ टक्के प्रभावी…