दिल्ली | अॅट्रासिटी कायद्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जातीवरुन शिवीगाळ, वैयक्तिक शिवीगाळ, जमीनीवरुन वाद किंवा सामाजिक वादावादी यासाठी आता अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार नाही. असा निर्णय एका निकालावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाने म्हणलं आहे.
न्यायालय काय म्हणाले ?
जर जाती-पातीवरुन अपमानित केल्याचे सिद्ध झालं नाही तर गुन्हा दाखल होणार नाही.
तक्रार करणारा हा अनुसूचित जाती\जमातीमधील असल्याने एखाद्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही.
कोणत्याही प्रकरणामध्ये अनुसूचित जाती\जमातीमधील व्यक्तीला त्याच्या जाती-पातीवरुन अपमानित करण्याचा हेतू नसेल तर गुन्हा दाखल होऊ शकत नाही.
कोणतेही प्रकरण हे चारचौघांमध्ये किंवा सार्वजनिक जागेवर घडले असेल तरंच अनुसूचित जाती\जमातीच्या संरक्षणासाठी असलेल्या अॅट्रासिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. खासगीत, घरात किंवा कुणी नसताना वाद झाल्यास या कायद्याअंतर्गत याला गुन्हा म्हणता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या – सीबीआयला तपासापूर्वी घ्यावी लागणार राज्यांची परवानगी -सर्वोच्च न्यायालय
“स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये”
भाजपा आमदार प्रशांत बंब विरोधात पैशांसाठी कारखान्याचे बनावट खाते काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं धनंजय मुंडेंचं आवाहन!