औरंगाबाद | गंगापूर तालुक्याचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात बनावट कागदपत्र वापरून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची, १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत बंब यांना अद्याप अटक झालेली नाही परंतु या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार व्याज वाटण्याच्या नावाखाली अधिकची दिली जाणारी रक्कम अपहार करण्यासाठी बेकायदेशीररित्या वापरल्याच्या फिर्यादीवरून प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
गंगापूर सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंदच आहे. राज्य सरकारने या कारखान्यावरील कर्जामुळे हा कारखाना जप्त केला आहे. तसेच संबंधित बँकेने कारखाना विक्रीस काढल्यानंतर संचालक मंडळाने यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या कारवाईत गंगापूर न्यायालयात कारखान्याकडून ९ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. सध्या न्यायालयाने ही रक्कम परत केली आहे. तर ती आतापर्यंत व्याजासह १५ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे तक्रारीत म्हणले आहे.
वाचा – महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं धनंजय मुंडेंचं आवाहन!
तसेच, कारखान्याला ७ नोव्हेंबर २०२० रोजी ही रक्कम परत देखील मिळाली. परंतु कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत बंब आणि प्रभारी संचालक बी एम पाटील यांनी संगनमत करून २० जुलै रोजी ही रक्कम बेकायदेशीररित्या कारखान्याचे खाते उघडून त्यात जमा केली. मात्र ते खाते देखील बनावट असल्याचं केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.