मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी राज्यातील “गायींच्या संरक्षण व संवर्धनासाठी” ‘गौ कॅबिनेट’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यासाठीची पहिली बैठक ही २२ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. “राज्यातील गोधनाच्या संरक्षण व जोपासनेसाठी ‘गौ कॅबिनेट’ स्थापन करण्याचा निर्णय झाला असल्याचे चौहान यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.
प्रदेश में गोधन संरक्षण व संवर्धन के लिए 'गौकैबिनेट' गठित करने का निर्णय लिया गया है।
पशुपालन, वन, पंचायत व ग्रामीण विकास, राजस्व, गृह और किसान कल्याण विभाग गौ कैबिनेट में शामिल होंगे।
पहली बैठक 22 नवंबर को गोपाष्टमी पर दोपहर 12 बजे गौ अभ्यारण, आगर मालवा में आयोजित की जाएगी।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 18, 2020
चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पशुपालन, वन, पंचायती राज आणि ग्रामिण विकास, महसूल, गृह आणि आदी खात्यांच्या मंत्र्यांचा तसेच शेतकरी कल्याण विभागांचा समावेश गौ कॅबिनेटमध्ये केला जाणार आहे. गौ कॅबिनेटची पहिली बैठक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अगर माळवा येथील गौ अभयारण्यात होणार आहे.
दरम्यान गौ अभयारण्याची स्थापना चौहान यांच्या सरकारने सप्टेंबर २०१७ मध्ये केली होती. यासाठी मध्यप्रदेश गौ संवर्धन बोर्डाने ३२ कोटी रुपये खर्च केले होते.