देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जम्मू काश्मीर गुपकर डिक्लेरेशनबाबत केलेल्या आरोपावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फेसबुकवर पोस्ट करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
https://www.facebook.com/265195530302394/posts/1787661548055777/
“भाजपने सातत्याने जनतेची खोटं बोलून फसवणूक केली आहे, फडणवीस यांनी काँग्रेसवर खोटे आरोप करून जनतेची फसवणूक केली आहे. भाजप नेत्यांची खोटं बोलण्याची जुनी सवय असल्यामुळेच फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काश्मीर विषयाबद्दल काँग्रेसवर खोटे आरोप करत दिशाभूल केली आहे.” असा गंभीर आरोप बाळासाहेब यांनी केला आहे.
“काँग्रेसचा काश्मीर डिक्लेरेशनमध्ये काहीही संबंध नाही, मात्र काँग्रेसवर आरोप करण्याच्या नादात आपण काय बोलतोय? याचंही भान त्यांना नाही.” असं देखील ते म्हणाले.
स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये. जम्मू-काश्मीरच्या माजी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले, याचा 52 वर्ष आपल्या मुख्यालयात तिरंगा न फडकवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक फडणवीस आता विलाप करत आहेत”, अशी देखील गंभीर टीका थोरात यांनी या पोस्टमध्ये केली आहे.
वाचा – भाजपा आमदार प्रशांत बंब विरोधात पैशांसाठी कारखान्याचे बनावट खाते काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं धनंजय मुंडेंचं आवाहन!