कोरोना पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानसह अन्य ११ देशातील नागरिकांसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत नव्याने व्हिसा जारी करणे बंद केले आहे. मागच्या आठवडयाभरात पाकिस्तानात नव्याने दोन हजार करोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता UAE हा निर्णय घेतला असल्याचे म्हणले जात आहे.
तसेच “यूएईने पाकिस्तानसह अन्य ११ देशातील नागरिकांसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत नव्याने व्हिसा जारी करणे बंद केल्याचे आम्हाला समजले असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाहीद हाफीझ चौधरी यांनी सांगितले आहे.
पाकिस्तान सोबत यूएई सरकारने टर्की, येमेन, सीरिया, इराक, इराण, सोमालिया, लिबिया, केनिया आणि अफगाणिस्तान या देशातील नागरिकांना देखील व्हिसा जारी करण्यावर स्थगिती आणली आहे.