भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कर्णधार विराट कोहलीने सिडनीमध्ये सराव करत असताना त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडिओ वर सूर्यकुमार यादवने कमेंट केली आहे. यामुळे सूर्यकुमारची ही कमेंट सध्या चर्चेत आहे.
विराट कोहलीचं कौतुक करत. सूर्यकुमार यादवने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की. “Energy, Fire Sound, can’t wait to watch Domination Fire” असं ट्विट करत #theBrand असा हॅशटॅगही दिला आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये एका सामान्य दरम्यान विराट कोहलीनं सूर्यकुमार यादवची स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला होता.पण सूर्यकुमारने उत्कृष्ट खेळी करून मुंबई संघाला विजय मिळवून दिला होता.
नक्की वाचा – त्या दिवशी विराट वडीलांच्या अंत्यसंस्काराला गेला नाही, पण मैदानात उतरला आणि…
सूर्यकुमार यादवने केलेली ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यानी सूर्यकुमार वर निशाणा साधला आहे. आहे त्याला ट्रोल करत आहेत. काही दिवसांआधी विराट कोहलीला ट्रोल करणाऱ्या एका वादग्रस्त मीमला सूर्यकुमार यादवने लाईक केले. आणि आता चक्क त्याच्या व्हिडिओ ची स्तुती केली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवची निवड झाली नाही. पण आयपीएल मध्ये सलग तीन वर्षे सूर्यकुमार धडाकेबाज कामगिरी बजावत आहे.भारतीय संघात त्याची निवड न झाल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विराट कोहलीला कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं.