भारतीय कायद्यानुसार सट्टेबाजी करणे हा गुन्हा मानला जातो. तसेच या सट्टेबाजी गुन्हाची नोंद झालेली बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.आता मात्र भारत सरकार क्रिकेटमधील सट्टेबाजीला कायदेशीर करण्याच्या विचारात असल्याचे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटले आहे.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर काय म्हणाले ?
आयसीआयसीआय सिक्युरिटीज फायनान्शियल कॉन्फरन्समध्ये बोलताना अनुराग ठाकुर म्हणाले की “सट्टेबाजी कायदेशीर करण्याचा प्रस्ताव आम्हाला तुम्हा लोकांमार्फत आला आहे. सट्टेबाजी अनेक देशांमध्ये कायदेशीर आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या मोठ्या देशातही याला मान्यता आहे. सट्टेबाजीतून देशाला हजारो कोटींचा महसूल मिळू शकेल. हा महसूलरूपी मिळणारा पैसा क्रीडा आणि इतर क्षेत्रांवर खर्च केला जाऊ शकतो”
अनुराग ठाकुर पुढे असेही म्हणाले की “मॅच फिक्सिंग रोखण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो” तसेच “फिक्सिंगमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा फायदा होईल” ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या पाच देशात सट्टेबाजी कायदेशीर आहे. भारत सरकार यावर लवकरच विचार करत आहे.
वाचा – त्या दिवशी विराट वडीलांच्या अंत्यसंस्काराला गेला नाही, पण मैदानात उतरला आणि…
ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी विराट आणि सौरव गांगुलीला कोर्टाची नोटीस!