गेली सहा महिने बहुप्रतिक्षित असलेल्या कोरोना लशीचा प्रश्न आता सुटल्याचे दिसत आहे. लवकरच कोविशील्ड ह्या लशीचा डोस बाजारात येणार आहे. यामुळे कोरोना लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, लवकरच ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावला यांनी ही लस ५०० ते ६०० रुपयांमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.
पुनावला यांनी एका मुलाखती दरम्यान २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफर्ड कोरोना लसीचे जवळपास ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध होतील तसेच त्याची किंमत ५०० ते ६०० रुपये एवढी असणार आहे असे सांगितले. भारत आमची प्राथमिकता असल्याने भारत सरकारला ही लस स्वस्त दरात दिली जाईल, असे ही ते म्हणाले.
माॅडर्नाने सोमवारी आमची लस कोरोणा वर ९४.६ टक्के प्रभावी असल्याचे घोषित केले होते, तसेच या आधी ही अमेरिका आणि जर्मनी यांनी एकत्रित पणे तयार केलेल्या फायझर आणि बायोटिक या लस देखील प्रभावी असल्याचे सांगितले होते. या दोन्ही लशींचा तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नंतरचा निकाल समाधानकारक लागला आहे. त्यामुळे लसीचे डोस देण्याचे काम डिसेंबर मध्ये चालू होऊ शकते.
वाचा – फास्ट टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागणार!