दिल्ली | देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला कॉंग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा पक्षांतर्गत निवडणूक घेऊन अध्यक्ष ठरणार आहे. यासाठी मतदान करणाऱ्यांचे डिजिटल आयडी कार्ड बनण्याची प्रक्रीया देखील सुरु झाली आहे.
यासाठी पक्षातील १५०० प्रतिनिधी निवडणूकीत सहभागी होतील. पक्षामधील सेंट्रल इलेक्शन ऑथेरिटी कडून मतदार यादी बनवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. मात्र या निवडणूकीत राहुल गांधींसोबत अध्यक्ष पदासाठी अजुन कोण उभा राहणार हा प्रश्न देशभरातुन विचारला जात आहे.या निवडणूकीत निवडुन आल्यास सोनिया गांधी यांच्या जागी त्या अध्यक्षाला बसावं लागेल. हे अध्यक्षपद पुढील २ वर्षांसाठी असेल.
दरम्यान, याआधी राहुल गांधी २०१७ साली देखील कॉंग्रेस अध्यक्षाची भुमिका बजावत होते. मात्र काही कालावधीनंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे आता अध्यक्षपदाची धुरा पुन्हा राहुल गांधींकडे जाणार का हे महत्वाचं ठरणार आहे.
वाचा – कोरोना लस मिळणार फक्त “एवढ्या” किंमतीत! अदर पुनावालांनी दिली माहिती
फास्ट टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागणार!