बिहार | राशीद सिद्दीकी या युट्युबरने त्याच्या स्वतःच्या चॅनेलवरून सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार यांचं नाव पुढे केलं आहे. याप्रकरणी अक्षयने या युट्युबवर आपल्या नावाची बदनामी केल्याप्रकरणी पाचशे कोटीचा नुकसान भरपाई दावा केला आहे.
राशीद सिद्दीकी या युट्युबरने अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांचा प्रसार याआधीही केला होता. त्या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावांचा उल्लेख त्यानं केला होता.
‘मिड डे’ या वृत्तपत्राने युट्यूबर सिद्धकी याने अक्षयने रिहा चक्रवती हिला कॅनडा इथं पलायन करण्यास मदत केली, तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात पडद्याआड चर्चादेखील सुरू होती. असं त्याने त्याच्या चॅनलमार्फत दाखवलं होतं.
सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी गेल्या चार महिन्यात सिद्दीकी त्याच्या बातमीच्या आशयामुळे त्याला पंधरा लाख रुपये मिळाले. सिद्दीकी याचं वय २५ वर्षे असून, तो पेशाने सिव्हिल इंजिनियर आहे. त्याचा स्वतःचा ff न्यूज नावाचा यूट्यूब चॅनल आहे.
या सर्व प्रकरणानंतर शिवसेना पक्षाचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी या युट्युबवर विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करत, जास्त पैसा मिळवण्यासाठी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात खोट्या बातम्या प्रसारित केल्या. कारण त्याला चॅनेलचे सबस्क्रायबर वाढवायचे होते. अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मे ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान अंदाजे ६,५०,८९८ अशी रक्कम त्याने व्हिडीओच्या मार्फत मिळवली आहे. या संपूर्ण प्रकरणात कोर्टाने सिद्दीकी याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, पोलिसांना तपास करण्यास सहकार्य करावे असेही सांगितलं आहे.