ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय संघाला सर्वात पहिली समस्या म्हणजे संघाच्या क्रमाबदल जाणवेल.कारण विराट कोहली तीन कसोटी सामने खेळणार नाही.कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय खेळाडूंवर अतिरिक्त दडपण येईल. अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली आहे.
२७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेद्वारे स्पर्धेला सुरुवात होत आहे. १७ डिसेंबर पासून विराट कोहली रजेवर असेल. तीन कसोटी सामन्यात त्याची अनुपस्थिती असेल. त्याची जागा कोण घेणार आणि भारतीय संघासाठी सलामी कोण करणार, कोहलीच्या जागी फलंदाजीला कोणता खेळाडू असेल. याचे उत्तर मात्र भारतीय संघाला शोधावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियात दिलेल्या एका मुलाखतीत पाँटिंग म्हणाले की “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीची अनुपस्थिती चाहत्यांना प्रकर्षांने जाणवेल, परंतु भारतीय खेळाडूंवर त्याच्या अनुपस्थितीचे अतिरिक्त दडपण येईल. त्यामुळे तिन्ही आघाडय़ांवर भारताचे खेळाडू कशाप्रकारे कामगिरी उंचावतात, हे पाहणे रंजक ठरेल”
पाँटिंग पुढेही म्हणाले की “कसोटी प्रकारात संघाचा महत्त्वपूर्ण फलंदाज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. अशा वेळी कोहलीची जागा कोणता फलंदाज घेणार, हे निर्णायक ठरेल. तसेच कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करण्याची शक्यता असल्याने त्याला स्वत:च्या फलंदाजीबरोबरच संघाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्यही करावे लागणार आहे. एकंदर भारतीय फलंदाजांवर प्रामुख्याने त्यांच्या संघातील भूमिकांविषयी अधिक दडपण असेल”
वाचा – सट्टेबाजी करणं भारतात कायदेशीर होणार!
त्या दिवशी विराट वडीलांच्या अंत्यसंस्काराला गेला नाही, पण मैदानात उतरला आणि…
ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी विराट आणि सौरव गांगुलीला कोर्टाची नोटीस!