अनेक जणांना आपल्याला मोफत नेटफ्लिक्स वापरायला मिळावं, असं वाटत असतं. तुमची इच्छा नेटफ्लिक्स आता लवकरच पूर्ण करणार आहे. नेटफ्लिक्सनं भारतात स्ट्रीमफेस्टचं आयोजन केलं असून येत्या 5 आणि 6 डिसेंबरला लोकांना मोफत नेटफ्लिक्सचा वापर करता येणार आहे.
भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनं आपला दबदबा निर्माण केला आहे. पण नेटफ्लिक्सला जास्तीत जास्त भारतीय लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तसेच नेटफ्लिक्सला भारतात ॲमेझॉन प्राईम हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत स्पर्धा करावी लागत आहे
नेटफ्लिक्सवरचे कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत, वेगवेगळ्या कार्यक्रमांची लोकांना ओळख व्हावी, यासाठी नेटफ्लिक्सनं स्ट्रीमफेस्टची योजना आखली आहे.
नेटफ्लिक्सचा मोफत वापर कसा करायचा?
नेटफ्लिक्सचा वापर करण्यासाठी तुम्हाला Netflix.com/streamfest या वेबसाईटवर जावं लागेल. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून देखील नेटफ्लिक्सचं अॅप डाऊनलोड करू शकता.
त्यानंतर तुम्हाला साइन अप करायचं आहे यासाठी तुमचा ई-मेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक चालू शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती भरायची गरज नाही. जर तुम्हाला कार्यक्रम आवडले तर तुम्ही पुढे चालू करू शकता.
नेटफ्लिक्सचा स्ट्रीम फेस्ट 5 डिसेंबरला रात्री बारा वाजल्यानंतर सुरू होईल व सहा डिसेंबरला रात्री 11:59 पर्यंत चालू असेल. नेटफ्लिक्सच्या या भेटीमुळं लोकांना शनिवारी आणि रविवारी खऱ्या अर्थाने विकेंडची मजा घेता येईल.