जम्मू काश्मीर मधील नगरोटा येथील चार दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घालत दहशतवाद्यांचा मोठा कट जवानांनी उधळून लावला. हे दहशतवादी पाकिस्तान मधील जैश- ए- महम्मद या संघटनेचे होते, त्यांच्याकडून जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे व स्फोटके ताब्यात घेतली. जप्त केलेल्या शस्त्रांवरून तरी मोठा विनाशकारी हल्ला करण्याचे दहशतवाद्यांचे नियोजन होते असे दिसून येते. पण सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे हा डाव फासला आणि दहशतवादी पकडले गेले. शुक्रवारी असे ट्विट करत मोदींनी जवानांचे अभिनंदन केले आहे.
Our security forces have once again displayed utmost bravery and professionalism. Thanks to their alertness, they have defeated a nefarious plot to target grassroots level democratic exercises in Jammu and Kashmir.
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2020
नगरोटा येथील झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महत्त्वपूर्ण ट्विट केले तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेतली तसेच राष्ट्रीय सुरक्षेचाही आढावा घेतला.
गुरुवारी सकाळी तीन तास चाललेल्या या चकमकीत जम्मूमधील नगरोटा महामार्गावर दडून बसलेल्या चार दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी ठार केले. जम्मुचे पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी हे दहशतवादी काश्मीर खोऱ्याकडे निघाले होते व मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते तसेच खोऱ्यातील स्थानिक निवडणुकांची प्रक्रिया उद्ध्वस्त करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, अशी माहिती दिली, तसेच या चकमकीत दोन पोलिस जखमी झाले आहेत.
२८ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीमध्ये जम्मू काश्मीर मध्ये जिल्हा विकास मंडळाच्या निवडणुका होणार आहेत. दहशतवाद्यांकडून मिळालेल्या स्फोटकांच्या साठ्यावरून २६ नोव्हेंबर सारखा हल्ला करण्याची तयारी दहशतवादी करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र जवानांच्या सावधानतेमुळे या हल्ल्याचा कट हाणून पाडण्यात आला असल्याचे ट्विट पंतप्रधानांनी केले.
वाचा – देश धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या आजाराला बळी पडलाय -माजी राष्ट्रपती
विवादित ट्विटमुळे कुणाल कामरावर खटला चालवण्याची परवानगी…
प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच करोना रुग्णांची संख्या वाढली आहे -महापौर किशोरी पेडणेकर