नाशिकच्या सतरा वर्षांच्या ओम महाजन याने काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर सायकलवरून केवळ ८ दिवस, ७ तास, ३८ मिनिटात पूर्ण करून एक नवीन विक्रम केला आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध लाल चौकातून निघालेल्या ओमने १३ नोव्हेंबर सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी सायकल राईडला सुरुवात केली.
ओमने ३ हजार ९०० किमी अंतर अवघ्या ८ दिवस, ७ तास, ३८ मिनिटात यशस्वीरीत्या पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली.
यापूर्वी नाशिक मधीलच भरत पन्नू यांनी ८ दिवस, ९ तास, ४९ मिनिटात काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर पूर्ण केले होते. तसेच नाशिकचे रॅम विजेते सायकलपटू असणारे डॉ. हितेंद्र महाजन यांच्याच मुलाने म्हणजे ओम महाजनने हे अंतर केवळ ८ दिवस, ७ तास, ३८ मिनिटात पूर्ण केल्याने पुन्हा एकदा हा विक्रम नाशिकच्याच नावावर नोंदवण्यात आला आहे.
मुलांनी शाळा व कॉलेजसाठी सायकलचा वापर करावा या हेतूने “बी कुल… पेडल टू स्कूल” असं घोषवाक्य असलेली ही सायकल राईड सायकलिस्टचे अध्यक्ष जसपाल सिंग यांना समर्पित केली.
श्रीनगर-दिल्ली-झांशी-नागपूर ते हैदराबाद-बंगळूरू-मदुराई ते कन्याकुमारी या मार्गाने ओमने ही सायकल राईड पूर्ण केली. सायकल कोच मिथेन ठक्कर आणि वडील डॉ.हितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने या विक्रमाची तयारी केली होती. तसेच डॉ. महेंद्र महाजन यांच्याकडून प्रेरित होऊन त्याने हा विक्रम केला आहे.
हे पण वाचा:
- शाळेची घंटा फक्त ग्रामीण भागातच वाजणार…
- आयबीपीएसच्या 600 हून अधिक रिक्त जागांसाठी मेगा भरती! जाणून घ्या पूर्ण माहिती
- रस्त्यातच आपला “हिरा” गमावलेल्या शेतकऱ्याला सोशल मिडीयावरुन युवकांच्या मदतीचा हात!
- जेएनयू हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांना क्लीनचीट…