इन्स्ट्यूट ऑफ बँकिंग अॅण्ड पर्सनल सेलेक्शनने (आयबीपीएस) 600 हून अधिक रिक्त जागांसाठी मेगा भरती करण्याची घोषणा केली आहे. यासाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 23 नोव्हेंबर आहे. फॉर्म भरण्यासाठी उमेदवार www.ibps.in किंवा sarkariresult.com लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकतात.
फॉर्म भरण्याचे शुक्ल 1000 रु. असणार आहे. तसेच एससी-एसटीसाठी हे शुल्क 175 रु. आकारले जाणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्याकरिता पासपोर्ट फोटो, सिग्नेचर स्कॅन अपलोड करावे लागणार आहे. यासोबतच महत्वाचे दस्ताऐवज स्कॅन करुन जोडावे लागणार आहेत.
या जागांसाठी अॅग्रीकल्चरल फील्ड ऑफिसरच्या 485 पदं, मार्केटिंग ऑफिसरच्या 50 जागा, राजभाषा अधिकारीच्या 20 जागा आणि एचआर/ पर्सनल ऑफिसरच्या 7 अशी राखीव पद ठेवण्यात आली आहेत.
तसेच यासाठीची शैक्षणिक पात्रता ही कुठल्याही विद्यापीठ व संस्थातून अॅग्रीकल्चरल अभियंतामध्ये पदवीधर असण्याची आहे. आयबीपीएसची परीक्षा ही दोन टप्प्यात होणार असून परीक्षा 26 आणि 27 डिसेंबरमध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर परीक्षेचा निकाल हा जानेवारी महिन्यात लागू शकतो.
या पदांसाठी फॉर्म भरत असाल तर
मार्केटींग ऑफिसर
या पदासाठी कुठल्याही क्षेत्रातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर होणे आवश्यक आहे. यासोबतच दोन वर्ष एमबीए मार्केटींग पदवीधर पाहिजे.
लॉ ऑफिसर
या पदासाठी मान्यता प्राप्त महाविद्यालयातून लॉमध्ये बॅचलर डिग्री, एलएलबी सर्टिफिकेट, यासोबतच बार काऊंसिलमध्ये अॅडवोकेट म्हणून एनरोल होणे आवश्यक आहे.
राज्यभाषा अधिकारी
या पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त महाविद्यालयातून हिंदी आणि इंग्लिश भाषांमध्ये पोस्ट गॅज्युअट उत्तीर्ण आवश्यक आहे. किंवा संस्कूतमध्ये पोस्ट गॅज्युअटसोबतच हिंदी, इंग्लिशमध्ये पद्वीधर होणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या – रस्त्यातच आपला “हिरा” गमावलेल्या शेतकऱ्याला सोशल मिडीयावरुन युवकांच्या मदतीचा हात!
जेएनयू हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांना क्लीनचीट…
आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल -देवेंद्र फडणवीस