मुंबई | वीज बीलावरुन महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच पेटलेले असताना यात मनसेने देखील उडी घेतलेली आहे. वीज दरवाढी विरोधात राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे मोर्चा काढणार आहे.
येत्या २६ नोव्हेंबरला राज्यस्तरीय मोर्चा काढणार असल्याची माहीती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. वाढीव बील विरोधात हा मोर्चा असुन हा मोर्चा शांततेत काढला जाईल असं देखील बाळा नांदगावकर म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका देखील केली आहे, ते म्हणाले की, तुम्ही का लोकांची फसवणुक करताय, तुम्हीच लोकांना म्हणाले होते की वीज बील माफ करणार, दिवाळी पुर्वी गोड बातमी देणार? मग आता काय झाला असा सवाल बाळा नांदगावकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या – शाळेची घंटा फक्त ग्रामीण भागातच वाजणार…
आयबीपीएसच्या 600 हून अधिक रिक्त जागांसाठी मेगा भरती! जाणून घ्या पूर्ण माहिती
रस्त्यातच आपला “हिरा” गमावलेल्या शेतकऱ्याला सोशल मिडीयावरुन युवकांच्या मदतीचा हात!