कोरोनामुळे गेली सहा महिने बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करणार असल्याचे राज्य सरकारने घोषित केले होते. परंतु कोरोणाने पुन्हा थैमान घातले असल्याने, आता शाळेची घंटा कधी वाजणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. 23 नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले होते परंतु कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने शहरात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
दिवाळीनंतर कोरोनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, परंतु पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने पालकांनीही शाळेचे संमतीपत्र नाकारले त्यामुळे नागपूर महापालिकेने 13 डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शहरातील शाळा सोमवारपासून सुरू होणार नसल्याने एक लाख 32 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनाही तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. शहरातील शाळा जरी सोमवार पासून चालू होणार नसल्या तरी ग्रामीण भागातील शाळा मात्र सोमवार पासून चालू होणार आहेत.
राज्य सरकारने 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचे आदेश काढले होते त्यामुळे महापालिकेनेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मुख्याध्यापकांना शाळेचे निर्जंतुकीकरण तसेच स्वच्छते संबंधी सूचना देण्यात आल्या होत्या. आज शहरातील बहुतेक शाळांचे निर्जंतुकीकरण ही करण्यात आले होते.
शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्यांना ही सुरुवात करण्यात आली होती. महापालिका क्षेत्रात एकूण 593 शाळातील सहा हजार 252 शिक्षकांपैकी केवळ 3 हजार ६५० शिक्षकांनी चाचणी केली १०० टक्के चाचणी पूर्ण झाली नाही. शिवाय शाळांचे स्वच्छता हे अद्याप पूर्ण झालेली नाही, तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना संमती पत्र नाकारल्याने महापालिकेला सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला.
शुक्रवारी सायंकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रामजोशी यांनी बैठक घेतली. यामध्ये कोरोणाची असलेली सद्य स्थिती तसेच पालकांनी नाकारलेले संमतीपत्र आणि गोष्टींचा आढावा घेऊन शहरातील शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 13 डिसेंबर नंतरही कोरोनाची स्थिती आणि पालकांची मनस्थिती आदी गोष्टींचा विचार करूनच शाळा सुरू करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहरात मनपा व खासगी अश्या एकूण ५९३ शाळा आहेत, त्यातील ६ हजार२५२ शिक्षकांपैकी आजपर्यंत फक्त ३ हजार ६५० शिक्षकांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे, त्यामध्ये शहरातील १६ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच ग्रामीण भागातील ६५७ शाळांतील ५ हजार ७७९ शिक्षकांपैकी ३ हजार १७३ शिक्षकांनी चाचणी केली असून त्यामध्ये एकूण २५ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ग्रामीण भागातील ६५७ शाळा सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या – आयबीपीएसच्या 600 हून अधिक रिक्त जागांसाठी मेगा भरती! जाणून घ्या पूर्ण माहिती
रस्त्यातच आपला “हिरा” गमावलेल्या शेतकऱ्याला सोशल मिडीयावरुन युवकांच्या मदतीचा हात!
जेएनयू हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांना क्लीनचीट…
आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल -देवेंद्र फडणवीस