जवळपास १०० वर्षांपूर्वी चोरून कॅनडात नेली गेलेली अन्नपूर्णा या देवतेची मूर्ती आता पुन्हा एकदा भारतात येणार आहे. ही मूर्ती कॅनडामधील विद्यापीठाच्या एका दालनात ठेवण्यात आली होती. ही मूर्ती सध्या कॅनडामधील मॅकेन्झी येथे आहे. अन्नपूर्णा या देवतेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.
कशी सापडली मूर्ती?
१९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या वर्ल्ड हेरिटेज सप्ताहामध्ये भारतीय कलाकार दिव्या मेहरा यांना मुर्तीबाबत गोष्ट ही निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी यासाठी प्रयत्न केले. यातून असं लक्षात आलं की, मेकेंझी हे १०० वर्षांपूर्वी भारतात आले होते, त्यावेळी वाराणसीतून ही मूर्ती तिकडे नेण्यात आली होती.
यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी ही मूर्ती पद्धतीने भारतात आणण्याची प्रक्रिया झाली आहे. यासाठी कॅनडा विद्यापीठाचे अंतरिम अध्यक्ष डॉ. थॉमस चेस यांनी भारतीय उच्चायुक्त यांच्याशी संपर्क देखील साधला आहे.
महत्वाच्या बातम्या – रस्त्यातच आपला “हिरा” गमावलेल्या शेतकऱ्याला सोशल मिडीयावरुन युवकांच्या मदतीचा हात!
जेएनयू हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांना क्लीनचीट…
आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल -देवेंद्र फडणवीस