काष्टी | नागवडे सहकारी साखर कारखान्यावर उसाची खेप घेऊन जाणाऱ्या महादेव सानप यांच्यावर आभाळ कोसळलं, कारण आपल्या बैलगाडीतुन ऊस घेऊन जात असताना, बैलगाडीचा हिरा नावाचा बैल जागीच कोसळला. महादेव यांनी लागलीच बेैलगाडीतुन उडी मारुन खाली येईपर्यंत हिराने जीव सोडला होता. महादेव सानप यांच्यासोबत भर रस्त्यात घडलेला हा प्रसंग पाहुन अनेकांना अश्रु अनावर झाले.
मात्र, तिथे उपस्थित असणाऱ्या काही युवकांनी हे सगळं मोबाईलमध्ये कैद केलं. या युवकांनी “गोड साखरेची कडू कहानी” असं म्हणून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला, यानंतर या शेतकऱ्यावर ओढवलेला प्रसंग बघून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला. काही तासातच हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
या व्हिडीओसोबत युवकांनी ह्या शेतकऱ्यावर आलेल्या प्रसंगावर साथ देण्यासाठी त्यांनी मदत करण्याचा विडा उचलला, ह्या शेतकऱ्याचा हिरा आता कधीच परत येणार नाही पण आपण मिळुन ह्यांना दुसरा हिरा घेण्यासाठी मदत कर असा आशयाचा मेसेज देखील व्हिडीओ सोबत व्हायरल केला, यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातुन महादेव सानप यांना मोठ्या प्रमाणावर मदत येऊ लागली.
यातुन आलेल्या मदतीतुन या युवकांनी महादेव सानप यांना नवीन बैल घेऊन दिला, यावेळी आपला हिरा गमावलेल्या महादेव यांचे अश्रु अनावर झाले. आजच्या काळात अश्या प्रकारे सामाजिक जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या युवकांची समाजाला गरज आहे, अश्या प्रतिक्रीया सोशल मिडीयावरुन येत आहेत. सुशांत राऊत, मोहीत धोका, सुरज दिवेकर, चांगदेव उंडे,सोनु मोरे, अमोल राऊत, दिपक दांगडे, अविनाश वंजारेव, अविनाश नाडे ह्या युवकांनी महादेव सानप यांच्या दुखाचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन या वेळप्रसंगी त्यांना साथ दिली.
महत्वाच्या बातम्या – जेएनयू हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांना क्लीनचीट…
आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल -देवेंद्र फडणवीस